1 min read

बालाजी विद्यालय गांधली – पिळोदे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा……

Loading

बालाजी विद्यालय गांधली – पिळोदे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा……

अमळनेर तालुक्यातील गांधली पिळोदे येथील बालाजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष दादासाहेब गिरीश दिलीपराव शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री सुधाकर साळुंखे, साहेबराव निकुंभ, तकदीर पिंजारी,प्रकाश पवार, गणेश पवार,विजय कुलकर्णी,सुधाकर शंकरपाळ, वि.का. सोसायटी चेअरमन विलास कुलकर्णी, पिळोदे गावाचे सरपंच सौ भारती पाटील,उपसरपंच श्रीमती पद्माबाई पारधी, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई कोळी, शबनम पिंजारी, जया पाटील, तिलोत्तमा पवार , कविता संदांनशिव, माजी सरपंच नरेंद्र पाटील,माजी उपसरपंच संतोष निकुंभ, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शासकीय कर्मचारी, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शाळेचे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात विविध शालेय स्पर्धांच्या विजेतांना बक्षीस वितरण करून गौरवण्यात आले. जवळपास विविध स्पर्धेतील 83 विजेता विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू तथा पुस्तक रुपी भेटवस्तू देण्यात आल्या. बालाजी विद्यालयाच्या कला शिक्षिका श्रीमती सुनिता देसले यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांचे कलाकृतींचे कला प्रदर्शन सादर करण्यात आले. या कला प्रदर्शनात शाळेतील 65 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कला वस्तू, मातीच्या वस्तू, वारली चित्रकला, वैज्ञानिक उपयुक्त वस्तू तयार केल्या होत्या. या कलादनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन हे कलादालन प्रदर्शनी 28 जानेवारीपर्यंत पालक व ग्रामस्थांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील जेष्ठ शिक्षक एन.वाय.पाटील, श्रीमती एल के पाटील, बी.ए.सयाजीराव, सी.वाय निकुंभ, पी.जे.निकम, आशिष शिंदे जे.एच.लोहार,एस के वंजारी,श्रीमती एस.इ.देसले,श्रीमती पी.एस.अहिरराव,
श्री.एन एस निळे, पी.एस.देवरे, एस.डी.सूर्यवंशी,श्रीमती एस जे पाटील,शेख मुसा, एस.बी.सोनवणे, बी.एस.भिल, आर पी. पवार आदींनी प्रयत्न केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष शिंदे यांनी केले.आभार श्री सी.वाय.निकुंभ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *