1 min read

यशोदीप विद्यालयात प्रजासत्तादिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमांचे आयोजन

Loading

यशोदीप विद्यालयात प्रजासत्तादिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमांचे आयोजन.

ठाणे ,कल्याण( मनिलाल शिंपी )श्री विघ्नहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदीप विद्यालय, मोहोने येथे स्वतंत्र भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष. अनिल आर.पाटील सर, संस्था सचिव श्री. भाऊसाहेब सोनवणे,आर एस पी प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी उपस्थित होते.यावेळी मनिलाल शिंपी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना सांगितले की, प्रत्येक शाळेतून शिक्षक बंधू भगिनी यांनी विद्यार्थ्यांचा सहभागातून वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाच्या संदेश द्यावा. असे संबोधित केले.यावेळी अ,प्रभागाच्या सभापती सौ.सुनंदाताई मुकुंद कोट,आजी माजी नगरसेवक, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पालक, हितचिंतक माजी विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाषणे ,नृत्य आणि विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले.त्यासाठीयशोदीप विद्यालयातील सर्व शिक्षकानी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रकाश टकले सर यांनी केले.याप्रसंगी माजी विद्यार्थी तसेच पालक प्रतिनिधी व विभागातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *