1 min read

उज्जैनकर फाउंडेशनच्या सहकाऱ्यांने सुरू झालेल्या मुक्ताई आय केअर सेंटर, मुक्ताईनगर येथे नुकतेच चार रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या सहकाऱ्यांने सुरू झालेल्या मुक्ताई आय केअर सेंटर, मुक्ताईनगर येथे नुकतेच चार रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या सहकार्याने मुक्ताईनगर येथे प्रथमच मुक्ताई आय केअर अँड रिसर्च सेंटर डोळ्याचे हॉस्पिटल नुकतेच सुरू झालेले आहे तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे नुकताच मोतीबिंदू मोफत तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले यामध्ये 205 रुग्णांची तपासणी करून 42 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली यामध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेमध्ये 50 टक्के सूट आणि त्यांना घरपोच वाहन सेवा तसेच इतर तपासण्या सुध्दा केल्या जातील. नुकतेच पुंडलिक सोनार, निर्मला ज्ञानेश्वर कन्हेर, हरताळा विमलबाई प्रकाश जावरे मुक्ताईनगर, किसन संपत वाघ निमखेडी आदी रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध फेको सर्जन डॉ. स्वप्नील पाटील जळगाव यांनी केली याप्रसंगी मुक्ताई आय केअरचे संचालक डॉ. सुनील मेश्राम यांनी रुग्णांना काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले प्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व फाउंडेशनचे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सचिव श्री गणेश कोळी सर उपस्थित होते. सुविधा मुक्ताईनगर शहरात प्रथमच सुरू झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *