1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब धर्मराज पाटील यांनी केले.मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी गावातील शिक्षणप्रेमी,देवगांव देवळी संस्थेचे संचालक, सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत देवगांव देवळी, चेअरमन व सदस्य विकास सोसायटी देवगांव देवळी, विविध संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,माजी विद्यार्थी यांचे स्वागत मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ध्वजसंचलन स्काऊट शिक्षक एस.के.महाजन यांनी केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनीं ध्वजगित सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आय.आर.महाजन, एच.ओ.माळी, ए.एस.सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, एस.ए.पाटील, जी.ए.पाटील यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *