1 min read

साळवे हायस्कूल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बक्षीस वितरण..

Loading

साळवे हायस्कूल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बक्षीस वितरण..

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – साळवे ग्रामसुधारणा मंडळ,संचलित साळवे इंग्रजी विद्यालय ता.धरणगाव येथे आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या व विजयी स्पर्धकांना प्रथम द्वितीय व उत्तेजनार्थ पुरस्कार शिल्ड, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी गोल्डमेडल विजेती सुवर्णकन्या रेणुका महाजनचा शाल श्रीफल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि धानो-याचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, गव्हर्नमेंट काँन्ट्ँक्टर भगवान महाजन यांनी पाच हजार एक रूपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे होते. संस्थेचे सचिव डॉ चंद्रकांत नारखेडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पी एम पाटील,साळव्याच्या सरपंच ईशाताई बोरोले, खर्द्याचे उपसरपंच योगेश पाटील, भामर्डीचे सरपंच श्री पाथरवट,गटनेते विनय भावे,पालकमंत्रींचे सुपूत्र विक्रांत पाटील, धरणगाव पोलिस स्टेशनचे सहा. फौजदार करीम सय्यद साहेब आणि इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी प्रतिमेचे पूजन केले. कविता चौधरी यांनी सुभाषबाबूंच्या जीवनावरील सुंदर गीत गायले, भगवान महाजन यांनी माहिती सांगितली पी एम पाटील सरांनी पाहूण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले, सूत्रसंचालन एस डी मोरे यांनी केले, आभारप्रदर्शन जी व्ही नारखेडे यांनी केले. कार्यक्रम आयोजिनासाठी ए वाय शिंगाणे, भूषण बोरोले, व्ही एस कांयदे, सौ प्रतिभा पाटील, एन बी पाटील, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *