1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा.
![]()


एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा.
नाशिक ( वार्ताहर)- आज नाशिक येथे नाशिक विभागीय समन्वय समितीची बैठक पार पडली. नाशिक विभागातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अपक्ष उमेदवार श्री सत्यजित तांबे, डॉक्टर सुधीर तांबे यांच्या बरोबर समन्वय समितीचे श्री सुनील भोर ( अहमदनगर) श्री योगेश पाटील, (जिल्हाध्यक्ष नाशिक), श्री संभाजी पाटील (जिल्हाध्यक्ष जळगाव), श्री प्रदीप ताके यांनी मनोगत व्यक्त करून सर्व शिक्षकांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी श्री सत्यजित तांबे म्हटले की माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी ज्याप्रमाणे आपल्या प्रश्नांना वाचा फोडली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचा प्रश्न निश्चितपणे योग्य ठिकाणी मी मांडेल. अधिवेशनापूर्वी तुमच्या दोन-चार प्रतिनिधींना बरोबर घेऊन निश्चितच मंत्री महोदयांना मी भेटेल. तुमचा मागणी न्यायिक असून त्यासाठी तुम्ही जिथे बोलवाल तेथे मी हजर असेल. मी विद्यार्थी दशेतच वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केलेली आहेत. संघर्ष हा माझ्या रक्तातच असल्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी योग्य न्याय देऊ शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे म्हटले की आता मी आपल्या प्रश्नासाठी पूर्ण वेळ उपस्थित असेल.
श्री सुनील भोर यांनी जुनी पेंशन प्रश्नाची सविस्तरपणे मांडणी केली.
यावेळेस प्रास्ताविक श्री संजय वाळे यांनी केले. प्रास्ताविकात डॉक्टर सुधीर तांबे यांनी कोरोनाच्या काळात मंत्रालयात केलेला पाठपुरावा, 10 जुलै 2020 ची अधिसूचना रद्द करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका, पुणे येथील आयुक्त कार्यालय सम्यक समितीच्या अहवालाच्या संदर्भात केलेला पाठपुरावा, अधिवेशनात उपस्थित केलेले मुद्दे, सुप्रीम कोर्टातील मुळ याचिकाकर्ते श्री. प्रदीप महल्ले यांच्याबरोबर केलेली सविस्तर चर्चा यांची सविस्तर चर्चा केली.
तसेच श्री सत्यजित तांबे व डॉक्टर सुधीर तांबे यांनी भविष्यात आमच्या या प्रश्नांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडावी असे स्पष्ट मत मांडले.
यावेळी एकमताने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने अपक्ष उमेदवार श्री सत्यजित तांबे यांना एक मुखी पाठिंबा देण्यात आला.
यावेळेस महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे ४५ प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. राजेंद्र देवरे जिजाऊ खताळ,उत्तमराव गायकवाड, ललित सांगळे, दिनेश अहिरे, संजय बोरसे रामकृष्ण बोरसे ,किशोर शिरसागर, अनिल पाटील, श्री रमजान हवलदार,श्री कैलास राहणे, श्री नवनाथ कोटकर, बाबा गुळवे, श्री जाकीर सय्यद, श्री सुनिल म्हसे , श्री बाबा थोरात,श्री दिलावर शेख, श्री देविदास खेडकर, श्री संजय भुसारी, श्री इंद्रसिंग गिरासे, श्री विक्रम खैरनार, श्री अमित कलाल, श्री प्रदीप पाटील, श्री प्रदीप ताके, श्री राजेंद्र जाधव, श्री विशाल तागड, श्री जयवंत पाटील, श्री सतीश गांजुरे, श्री रामनाथ वर्पे ,श्री अरुण गुंजाळ श्री बाजीराव वाकचौरे, इंद्रसिंग गिरासे, श्री विक्रम खैरनार, श्री अमित कलाल, श्री प्रदीप पाटील, श्री मधुकर गांगुर्डे, श्री संजय काकुस्ते,, श्री रवींद्र शिंदे, श्री कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

