पांचाळ सुतार समाजाची त्रैमासिक सभा संपन्न
![]()
पांचाळ सुतार समाजाची त्रैमासिक सभा संपन्न
जळगाव प्रतिनिधी-श्री विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाची त्रैमासिक सभा मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी जळगाव येथील कार्यालयात संपन्न झाली.प्रारंभी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन अरुण जाधव यांनी केले.
सदरहू त्रैमासिक सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग खजिनदार मनोहर रुले यांनी वाचून दाखविले.दिनांक २१ जानेवारी २०२३ अखेर बांधकामाचे खर्च त्यांनी सादर केला.सदरहू खर्चाला उपस्थित कार्यकारी मंडळ आणि सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानंतर उर्वरित सभागृहाचे प्लास्टर,गेट,दरवाजे आणि अन्य खर्चाचे इस्टिमेट अध्यक्ष अरुण जाधव,उपाध्यक्ष निलेश सोनवणे,सल्लागार गोपाळ लुले, कार्याध्यक्ष डॉ.डि.बी.सुतार यांनी सांगोपांग चर्चा करून भावी खर्चाचे नियोजन चर्चानुषंगे केले.बांधकामासाठी लागणारा निधी संकलन करण्याबाबत चर्चा विनीमयाने निधी संकलनासाठी जिल्हाबाहय समाजातील दातृत्वशील मंडळींकडे जाण्याचे नियोजन करण्यात आले.३ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्या संदर्भात सूत्रबद्ध नियोजन जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ऐनवेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रासंगिक विषयावर यथोचित चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभेचा समारोप झाला.त्रैमासिक सभेस मंडळाचे सदस्य संजय जाधव, किरण लुले, सिद्धू चव्हाण, विजय लुल्हे,भागवत वाघ, दिपक खैरनार यांसह समाज बांधव उपस्थित होते .
सभेचे प्रास्ताविक सहसचिव विकास हिरोळकर, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भागवत रुले यांनी केले.


