1 min read

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोक चळवळ होणे गरजेचे : डॉ.प्रदिप जोशी

Loading

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोक चळवळ होणे गरजेचे : डॉ.प्रदिप जोशी

[ व.वा.वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा ]

” मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोकचळवळ होणे गरजेचे ” असे मार्मिक प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ . प्रदिप जोशी यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शतकोत्तरी ग्रंथालय वल्लभदास वालजी वाचनालय जळगाव तर्फे रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी वाचनालयात नवीन पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष तथा मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले त्या प्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना डॉक्टर जोशी बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी वाचनालयाच्या चिटणीस शुभदा कुलकर्णी, सदस्य शितल बेंडाळे , साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या प्रख्यात लेखकांची नावाजलेली ग्रंथसंपदा वाचकांना ज्ञात व्हावी, विविध वैचारिक,वाड्.मयीन, राष्ट्रीय,ऐतिहासिक अशा विविध साहित्य प्रकाराचे ग्रंथ एकाच वेळी अभिरुचीसंपन्न वाचकांना प्रत्यक्ष चाळता यावे यासाठी वाचनालयाचे सक्रिय सदस्य संगिता अट्रावलकर , डॉ.प्रिती पाटील,अँड.श्री ओम अग्रवाल यांच्या पुढाकाराने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथाची साहित्य प्रकारानुसार आकर्षक मांडणी वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे व ज्येष्ठ कर्मचारी शांता तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शिंदीकर , ज्ञानदेव वाणी, गिरीष तारे यांनी केली. प्रस्तावना, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभदा कुलकर्णीं यांनी केले.
रविवारची सुटी असुनही कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.ग्रंथ प्रदर्शनास अजय काशिद सर यांनी विद्यार्थ्यांसह भेट दिली याप्रसंगी डॉ.मनोज पांडे यांसह वाचक सभासद व ग्रंथपेमी उपस्थित होते. सदरहू प्रदर्शन २८ जानेवारी २०२३ पर्यंत अभिरुची संपन्न वाचकांसाठी व ग्रंथ प्रेमींसाठी वाचनालयाच्या कालावधीत खुले राहील असे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी संचालक मंडळातर्फे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *