1 min read

साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या,रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !…

Loading

साळवे हायस्कूलची रेणुका ठरली सुवर्णकन्या……

रेणुका महाजनची राज्य स्पर्धेसाठी निवड !…

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – साळवे इंग्रजी विद्यालय,साळवे ता.धरणगाव ची ई १२ वी ची विद्यार्थीनी रेणूका महाजन हिने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजनी गटात फ्रीस्टाईल स्पर्धेत नाशिक येथील भगूर तालमीत विभागस्तरीय सामन्यात प्रतिस्पर्धी मल्लाला पहिल्या फेरीत सहा गुणांनी चितपट करून दुस-या फेरीत आठ गुण मिळवून दणदणीत विजय मिळवला. नाशिकची पहेलवानला चितपट करून तिने गोल्ड मेडल मिळवून विशेष प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यामुळे तिचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानिमित्ताने ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, सचिव डॉ चंद्रकांत नारखेडे आणि संचालक मंडळाने, शाळेचे मुख्याध्यापक ए एस पाटील, वर्गशिक्षक भरत गालापूरे, क्रिडाशिक्षक भूषण बोरोले, व्ही एस कांयदे आणि मार्गदर्शक एस डी मोरे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगीनींनी अभिनंदन केले. विद्यार्थी मित्र-मैत्रीणींनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *