1 min read

ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार

Loading

ठाणे जिल्ह्यातील रूनाली पवार ची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड ,. ( लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण) रूनाली पवार ही आगरी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण युवा पिढीसाठी हिरकणी आयकॉन आहे. :: डॉ.मनिलाल शिंपी: 👉आपण एकदा निश्चय करा तो नक्कीच पूर्ण होऊ शकतो- रुणाली पवार

मुंबई ठाणे (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील मौजे खंबाळे गावातील सुकन्या कुमारी रुणाली दयानंद पवार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व
न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) मुख्य परीक्षेत महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवून दिवाणी न्यायाधीश (जज) या पदावर नियुक्ती होऊन महाराष्ट्रातून आगरी समाजाचे नाव तिने लौकिक केले आहे, त्यामुळे तिचे दैनिक स्वराज्य तोरण परिवार, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था गुंदवली, तसेच संपादक- दैनिक स्वराज्य तोरण तथा सचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग डॉ.श्री .किशोर बळीराम पाटील, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर.एस.पी.कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे, पोलीस पाटील संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री सोमनाथ बाळाराम ठाकरे, सुरज लोकचे संपादक- आचार्य सुरजपाल यादव कोमल समाचार चे संपादक – श्री श्रीनिवास सिरीमल्ली यांनी प्रत्यक्ष त्यांच्या मौजे खंबाळे येथील निवासस्थानी गुरुवार दिनांक १९/१/२०२३ रोजी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी अभिनंदन करताना सांगितले की,ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रूनाली पवार या हिरकणी ने उज्वल केले, आणि आजचा युवा पिढीतील मुलींना स्वयंभू स्थान प्राप्त करण्यासाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक म्हणून आदर्श आहे.असे मत व्यक्त केले. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे यांनी ही रूनालीचे कौतुक करताना सांगितले की, खरोखर आमचा आगरी कोळी समाजामध्ये नवीन कीर्तीची ज्योत प्रज्वलित करून आदर्श निर्माण केला आहे.याचा आम्हाला अभिमान आहे. आणि शेवटी स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांनी ही हिंदी शेर शायरी करत न्यायमुर्ती रूनाली पवार हीचा या गरुड भरारीचे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातील युवतींना प्रेरणा आणि उत्साहदायी ठरणार आहे आहे शब्दात अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच सौ.अनिता लक्ष्मण वळवी सरपंच ग्रामपंचायत खंबाळा,
सौ.निकिता बाळा शेळके उप- सरपंच ग्रामपंचायत खंबाळा, ग्रामसेवक,समस्त सन्माननीय सदस्य, आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ मंडळ खंबाळा, व आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहून कुमारी रुणाली दयानंद पवार हिला शुभाशीर्वाद दिले, त्याचप्रमाणे वडील दयानंद पांडुरंग पवार, आई रंजना दयानंद पवार,मावशी तारा मांजरेकर, मामा दीपक रामचंद्र पष्टे, रामचंद्र हिमाजी पष्टे, महादेव बापू कराळे ,संतोष महादेव कराळे, तसेच माझे शिक्षक गणेश शिरसाट या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे शिखर गाठू शकेले, काका मिठाराम पांडुरंग पवार, संदीप आनंता पाटील, गणेश शांताराम पाटील, विजय यशवंत पाटील, विठ्ठल सखाराम शेळके, दीपक तुकाराम पाटील,महेश वामन पवार, गणपत दत्तात्रय पाटील,
यांचे ही सहकार्य लाभले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *