1 min read

ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर

Loading

ज्येष्ठांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आयुष्यामध्ये द्विगुणीत करा – डॉ. शिवचरण उज्जैनकर

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा वडोदा येथे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय कु-हा, काकोडा यांचे राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या अंतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर नुकतेच प्रारंभ झाले या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी उज्जैनकर बोलताना म्हणाले की, ज्याप्रमाणे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचे रान केले, शहिदांनी बलिदान दिले, राष्ट्रसंतांनी, हुतात्म्यांनी सुसंस्काराच्या माध्यमातून बिजारोपण केले त्या ज्येष्ठांचे सुसंस्काराची शिदोरी आपल्या भावी आयुष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून द्विगुणित करून आपले आयुष्य सुजलाम सुफलाम करावे आपल्या आई-वडिलांचे ज्येष्ठांचे सुसंस्कार आपल्या जीवनात अनमोल ठेवा असतो तो आपण जपून ठेवावा व त्याप्रमाणे आपण जीवन जगावे असा मोलाचा संदेश डॉ. उज्जैनकर यांनी विद्यार्थ्यांना दिला उज्जैनकर यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांना कथन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की जीवनामध्ये निर्व्यसनी बना ज्येष्ठांची सेवा करा, देशभक्ती समोर ठेवून समाजाची सेवा करा. असेही डॉ.उज्जैनकर सर प्रसंगी म्हणाले याप्रसंगी या निवासी शिबिरामध्ये 50 विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा सहभाग होता परमपूज्य माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी संचलित कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातर्फे हे हिवाळी शिबिर आठ दिवस निवासी असून यामध्ये विविध व्याख्यानांचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे याप्रसंगी येथील कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. पी. मेतकर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.शितल मस्के यांनी डॉ. उज्जैनकर यांचा पुष्प व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट देऊन सत्कार केला याप्रसंगी प्रा. एच.पी. मेतकर यांनी उज्जैनकर यांचा कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. याप्रसंगी संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी सर तसेच प्राचार्य एस. एन. जोशी यांची विशेष उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *