1 min read

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप

Loading

BBM Acoustic (India) Private Limited आणि उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड मुळे एकल झालेल्या महिलांना रोजगार व व्यवसाय करण्यासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच कुटुंबातील कर्तव्यक्त्यांच निधन झालं आणि त्यानंतर अनेक महिला एकल झाल्या या महिलांचे पुढं आर्थिक सामाजिक प्रश्न यावर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम सुरू झाले.

आज एकल महिलांना आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून शिलाई मशीन चा वाटप करण्यात आलं यामुळे महिला घरी बसून देखील शिलाईचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकतील या उद्दिष्टाने मशीन देण्यात आले त्याचप्रमाणे 20 महिलांचा उदयकाळ सावित्री महिला बचत गट स्थापन करून महिलांनी जे उत्पन्न कमवले त्यातुन बचतीची सवय लागणे व पुढे व्यवसाय वाढण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे
Vitthal Patil – AGM – AIS

Laxman Karbhari – Head – HR, Admin & EHS

Hemant Jadhav – Head Purchase

Umesh Tak – Sr. Manager Exhaust System

Ashishkumar Dharaskar – Asst. Manager Accounts

Aparna Patil – Asst. Manager – HR & Admin

Uttam bodke

Gajanan Gurav

Balkrishna Bagul – President, Udaykal Foundation

विश्वास सूर्यवंशी, व्यंगचित्रकार, पुणे

जयश्री पाथरकर, अध्यक्ष – लोकमंगल सर्वसेवा सोसायटी, पुणे

वरील मान्यवरांनी उपस्थित कोविड मधील एकल महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरती साळी, कार्तिक चव्हाण यांनी सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा डांगे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *