1 min read

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 हा दिवस भूगोल तज्ञ श्री चंद्रशेखर देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आजचा दिवस भूगोल दिन साजरा

Loading

श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 हा दिवस भूगोल तज्ञ श्री चंद्रशेखर धोंडीराम देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आजचा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी आश्रम शाळेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात भूगोल दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. इयत्ता आठवी ते बारावी माध्यमिक विभागात भूगोल दिनानिमित्ताने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
1) भूगोल विषयावर आधारित प्रश्न उत्तरातून “चालता बोलता कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले.
2) आश्रम शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी भूगोल विषयाच्या काही संकल्पना भितीपत्रके तयार करून रेखाटल्या.
3) थोर भूगोल तज्ञ श्री.चंद्रशेखर धोंडीराज देशपांडे यांच्या जीवनाबद्दल माहिती इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ललिता भीमसेन पावरा याने सादर केली .
4) विद्यार्थ्यांसाठी नकाशा भरणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी ला शिकवणारे भूगोल शिक्षक व इतर सर्व शिक्षक यांनी सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच आज भूगोल दिना निमित्त आपल्या आश्रमशाळेतील भूगोल विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षक *कै.सागर नाना पाटील* यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ताईसो विद्याताई युवराज पाटील व शैक्षणिक सल्लागार नानासाहेब युवराज पाटील तसेच पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

💐💐🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *