1 min read

ब्राम्हणशेवगे येथे केअरिंग फ्रेंड्स आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे मदतीने बांधबंदिस्ती कामांचा शुभारंभ.
संक्रातीच्या दिवशी वडाचे झाड लाऊन जलसंधारण कामांची सुरुवात.

Loading

ब्राम्हणशेवगे येथे केअरिंग फ्रेंड्स आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे मदतीने बांधबंदिस्ती कामांचा शुभारंभ.
संक्रातीच्या दिवशी वडाचे झाड लाऊन जलसंधारण कामांची सुरुवात.

चाळीसगाव / प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यात भुजल अभियानाच्या माध्यमातून 34 गावांमध्ये जलसंधारण व पर्यावरण रक्षणाची कामे सामाजिक संस्था कंपनींच्या मदतीने गुणवंतदादा सोनवणे यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून सुरु आहेत.
ब्राम्हणशेवगे येथेही गेली सात वर्षापासून नालाखोलीकरण व रुंदीकरण,एक गाव एक तलाव निर्माण करणे,शिवार रस्ते,गाळ शेतात टाकणे ई.कामे सातत्याने सुरु आहेत.
केअरिंग फ्रेड्स,सेवा सहयोग फाऊंडेशन यांचे आर्थिक मदतीने भूजल अभियान अंतर्गत गुणवंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून व सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून चालू वर्षाच्या बांधबंदिस्ती कामांचा शुभारंभ संक्रातीच्या दिवशी वडाचे झाड लाऊन करण्यात आला.
याप्रसंगी जगराम राठोड, मा.सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मदन राठोड, पोलीस पाटील राजेंद्र माळी, माळशेवगे येथील विलासजी पाटील,भुजल अभियानाचे भुजल वारकरी मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, रमेश राठोड, मोरसिंग चव्हाण, विष्णू राठोड,देविदास राठोड, कैलास राठोड, रंगनाथ भाऊ,राकेश चव्हाण, विलास चव्हाण, नारायण चव्हाण, रघविर चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
हि कामे यशस्वी करण्यासाठी भूजल अभियान टिमचे राहूल राठोड, पंकज राठोड, योगेश राठोड आदि परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *