ग्रह,चंद्र ,सूर्य , तारे !अवकाशावर बोलू काही! कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण पिंपळे आश्रम शाळेत…..
![]()

ग्रह,चंद्र ,सूर्य , तारे !अवकाशावर बोलू काही! कार्यक्रमाचे अप्रतिम सादरीकरण पिंपळे आश्रम शाळेत
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सुअ पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु.येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली पासून तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भूगोल दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आश्रम शाळेच्या परिसरातील शेतातील विविध पिके ,वृक्ष, फुलझाडे, पक्षी, खडक, माती, नदी नाले ,बंधारे,यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली व प्रत्यक्ष भेटी दिल्या.
संध्याकाळच्या सत्रात खानदेशातील नावाजलेल व्यक्तिमत्व आदरणीय विजयसिंह पवार सर खगोल अभ्यासक, व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचा अवकाशावर बोलू काही# हा कार्यक्रम पिंपळे आश्रम शाळेत घेण्यात आला. दृकश्राव्य साधनांचा वापर करून ग्रह, चंद्र ,सूर्य ,तारे, अवकाश गंगा, अवकाश मोहिमा, एस्ट्रोनॉट यांचं अप्रतिम सादरीकरण विजयसिंह पवार सर यांनी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर सादर केलं. अवकाशातील घडणाऱ्या भौगोलिक घटना अतिशय रंजक पद्धतीने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. सदर कार्यक्रमाच आयोजन माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री एस. एच. कागणे यांनी केले. तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे व श्री उदय पाटील यांनी सदर उपक्रम घेण्यासाठी मार्गदर्शन केले व कार्यक्रमासाठी श्री चेतन पाटील, श्री गंगासागर वानखेडे , श्री नितीन सोनवणे,श्री राहुल पाटील,श्री उदय भाऊसाहेब, अधिक्षक प्रविण पाटील,अधिक्षिका विद्या पाटील उपस्थित होते.श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा ताईसो विद्याताई युवराज पाटील व शैक्षणिक सल्लागार नानासाहेब युवराज पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शन विविध उपक्रम राबविले जातात

