1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे नायब तहसीलदार यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन

Loading

आज दिनांक 14/01/2023 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते (नायब तहसीलदार तहसील कार्यालय धरणगाव).व सौ.अंजना लक्ष्मण सातपुते,श्री.प्रज्वल लक्ष्मण सातपुते (आयटी इंजिनियर) यांनी सदिच्छा भेट दिली.मा.रावसाहेब श्री.लक्ष्मण नामदेव सातपुते यांच्या कडून सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना मिष्ठान्न भोजन दिले.यावेळी संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर हे उपस्थित होते.मा.लक्ष्मण सातपुते साहेब यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांचे हस्ते करण्यात आला.तसेच समवेत सौ.अंजना लक्ष्मण सातपुते,प्रज्वल लक्ष्मण सातपुते, बाबुलाल पाटील, मुक्ताबाई पाटील हे उपस्थित होते.यावेळी प्रधान या विद्यार्थी समवेत संगीता महाजन मॅडम यांनी ईतनी शक्ती हमे दे ना दाता हे भक्ती गीत सादर केले. स्वागत गीत सविता पाटील, वैशाली पाटील, संगीता महाजन मॅडम यांनी सादर केले.मा.साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच, आपल्या या कार्याची महाराष्ट्र शासन नक्कीच घेईल.अशी शाबासकीची थाप अध्यक्ष – अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर व‌ सर्व‌ कर्मचारी यांना दिली. आपण मला हाक द्या मी नेहमी आपल्या मदतीला धावून येईल,असे आश्वासन दिले.यावेळी शाळेची माहिती हेमंत महाजन सर यांनी दिली.सुत्रसंचालन प्रताप पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश सोनवणे सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *