स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी .
![]()

स्व. श्री. एम. एस .मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी .
अमळनेर – स्व. श्री. एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालयात राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
इ 9 वीची विद्यार्थ्यीनी जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा साकारलेल्या तेजस्विनी महाजन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री धनराज महाजन सर यांनी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व गीतांच्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांविषयी माहिती दिली.
मा.श्री .राजेंद्र महाजन सर, मा, श्री ,किशोर पाटील सर व मा.सौ नेहा पाटील मॅडम यांनी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला, जिजाऊ माँसाहेब एक धाडसी, कर्तबगार ,मुत्सदी, संयमी ,न्यायी, पराक्रमी, प्रसंगावधानी , रणरागिणी होत्या.असे सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री धनराज महाजन सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या तरुण पिढीला राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या आचार
विचारांची गरज आहे. व त्यांचे आचार विचारअंमलात आणले पाहिजे असे सांगितले .व राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्या वर प्रकाश झोत टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. 10वीची विद्यार्थिनी कु. निकिता चौधरी हिने केले
सुनील पाटील सर यांनी आभार मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

