सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे रवींद्र सोनवणे यांचा सत्कार
![]()

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे रवींद्र सोनवणे यांचा सत्कार
जळगाव जिल्हा परिषदेच्या कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे उपअभियंता आर. एम.कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी रवींद्र सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत राहील असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, उपाध्यक्ष सुनील सोनवणे, एन.डी. सोनवणे,सुनील सावंत,जितेंद्र जावळे,जितेंद्र बारी, उपस्थित होते. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार एन. डी. सोनवणे यांनी मानले

