1 min read

बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन- सदर प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आयोजकांचे आवाहन…

Loading

बालवैज्ञानिकांचे विज्ञान प्रदर्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

आर पूर्व विभागाचे विज्ञान प्रदर्शन
सेंट जॉन्स हायस्कूल बोरीवली पूर्व येथे दिनांक 17 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केलेले आहे.

सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान व खेळणी
हा असून एकूण 7 उपविषयावर विविध प्रकल्प सादर केले जातील.
एकूण 90 पेक्षा जास्त शाळांचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनात आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. 3 वर्षानंतर प्रथमच ऑफलाईन पद्धतीने सदर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जात असल्याने विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांमध्ये उत्साह जाणवत आहे.

पर्यावणीय चिंता या विषयावर मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सादर केले जातील असे आता पर्यंतच्या प्रवेशिकांवरून जाणवते आहे.

शिक्षकांनी गणितीय आकडेमोड व भौमितिक आकृत्या यावरील शैक्षणिक साधनांना महत्व दिल्याचे समजते.

सदर प्रदर्शनाला आर पूर्व विभागातील महाराष्ट्र बोर्ड,CBSE, ICSE ,BMC तसेच रात्र शाळा मिळून 100 शाळांचे विद्यार्थी 3 दिवसात भेट देतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन
मा श्री संदीप संगवे
शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग
तर शास्त्रज्ञ डॉ कुमार हेमंत सिंह हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सहशालेय उपक्रमांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी जवाहर बालभवन मुंबई चे संचालक मा.श्री राजू नाईकवडी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सांगता सोहळा व पारितोषिक वितरण समारंभासाठी व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सन्मान सोहळ्यासाठी दिनांक 19 जानेवारी रोजी शिक्षक प्रिय आमदार मा. श्री कपिल पाटील व जेष्ठ समाजसेवक अजय कौल सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सदर प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजक
सौ अश्विनी लाठकर शिक्षण उपनिरीक्षक

श्री संजय पाटील
मुख्य निमंत्रक

व सौ शिबा नम्बीयार ट्रस्टी सेंट जॉन्स हायस्कूल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *