राज्यातील शिक्षकांच्या रजा संदर्भात आमदार कपिल पाटील
यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र.
![]()

राज्यातील शिक्षकांच्या रजा संदर्भात आमदार कपिल पाटील
यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
१. राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना १५ किरकोळ रजा, अर्जित रजा व अन्य सुविधा मिळतात. मात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १५ किरकोळ रजा आणि अर्जित रजा मिळत नाहीत. ते मिळणे आवश्यक आहे.
२. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या सार्वजनिक सुट्टया असल्या तरी शिक्षकांना त्यादिवशी शालेय व राष्ट्रीय कार्यक्रम व कर्तव्यामुळे सुट्या घेता येत नाहीत. त्यांना त्याबद्दल्यात भरपाई रजा मंजूर करण्याची आवश्यकता आहे.
३. अर्जित रजा कॅश करण्याबाबत सर्व राज्य सरकारी, निमसरकारी व अनुदानित शिक्षक यांना समान न्यायाने लागू असूनही शिल्लक रजा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना शिक्षणाधिकारी कॅश होऊ देत नाही. यामुळे शिक्षकांवर अन्याय होत आहे.
शिक्षकांच्या या समस्या बाबींबाबत तातडीने उचित अंमजबजावणी करावी, अशी विनंती मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना केली आहे.
मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या विनंतीबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया ग्रंथपाल श्रीमती आरती शर्मा यांनी व्यक्त केली आहे. दिवाळी व उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना दहावी बारावी परीक्षा मुल्यमापनाचे काम असते. कागदोपत्री सुट्टी दिसत असली तरी शिक्षकांचे काम हे चालूच असते असे मत जितेंद्र महाजन सरांनी व्यक्त कैले. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केलेल्या रजेच्या संदर्भातील विनंती लवकरच मान्य होईल असा विश्वास शिक्षकवर्गांनी व्यक्त केला आहे.

