पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थ्यांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा
![]()



पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थ्यांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा
ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी )::३३ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे. पोतदार इंटरनॅशनल स्कूल कल्याण पश्चिम मधील विद्यार्थ्यानाकडून वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी करणे,हेल्मेट वापरणे याविषियी आपण आपल्या परिसरात लोकांमधे जनजागृती करावी.असे सांगत आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रतिज्ञा दिली. वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक श्री महेश तरडे साहेब,यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज असते, नियमबाह्य मोटार वाहन चालवण्याबाबत होणारे दुष्परिणाम संगणकाचा आधारे चित्रफित दाखवून विद्यार्थ्याना पटवून दिले. मोटार वाहन निरीक्षक श्री. अमोल पवार यांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे, सीटबेल्ट चा वापर करून कार चालवणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच १८वर्षापेक्षा कमी वय असेल तर वाहन चालवणे गुन्हा आहे. असे मार्गदर्शन करताना सांगितले. उपस्थित होते.यावेळी वाहतूक पोलीस उमनिरीक्षक संतोष भालेराव, हेडकॉन्स्टेबल सतिष चौधरी, भगवान कारोटे,महिला वाहतूक पोलिस नंदिनी शिंदे,योगेश सोनवणे, आर एस पी अधिकारी शिक्षक जितेंद्र सोनवणे, पोतदार इंटरनॅशनल स्कूल प्राचार्या संजीवनी बोस, असिस्टंट मॅनेजर अमित कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एफिल फैरो,तसेच शाळेचे शिक्षक कंचन गवळी,श्रद्धा शेलार, प्रिया
खंडेलवाल,शिल्पी सिंह, माधवी मॅडम, प्रिया कुलकर्णी, प्रवीण वर्कीय, आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

