गुरु पौर्णिमा हा उत्सव ज्याप्रमाणे पालकांसोबत साजरा करता त्याचप्रमाणे अपंग व निराधार, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील करावा- डॉ. यशवंत म्हात्रे
![]()



गुरु पौर्णिमा हा उत्सव ज्याप्रमाणे पालकांसोबत साजरा करता त्याचप्रमाणे अपंग व निराधार, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील करावा- डॉ. यशवंत म्हात्रे
विवेकानंद शिक्षण संस्थेचे रूपांतर आता वटवृक्षात झालेले आहे-डॉ. किशोर पाटील
विवेकानंद इंग्लिश माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न! ठाणे,कल्याण:(मनिलाल शिंपी) शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मानगर या शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात गुरुवार दिनांक १२/१/२०२३ रोजी शाळेच्या सभागृहामध्ये संपन्न झाला.
१२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंती दिवस असतो व याच दिवसाचे औचित्य साधून गेल्या २२ वर्षापासून विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मानगर भिवंडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्याची संधी सर्व संचालक मंडळ व शिक्षक वर्ग उपलब्ध करून देते, व आपला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यानिमित्ताने मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात साजरा करतात. गुरुवार दिनांक १२/१/२०२३ रोजी साजरा करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव डॉक्टर श्री यशवंत अनंत म्हात्रे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून हाडांचे प्रसिद्ध डॉक्टर श्री.निकेश गोसराणी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाचे सचिव डॉक्टर श्री. किशोर बळीराम पाटील, शारदा शिक्षण सोसायटी चे अध्यक्ष श्री.महेश कोंडा, उपाध्यक्ष श्री.वेंकटेश मंचिकंटला,सचिव श्री.राजू भीमनाथ, सहसचिव डॉ. सत्यनारायण पेंबटला, खजिनदार श्री.नरेश कोंडा, सह- खजिनदार श्री.सुधाकर गालीपील्ली, संचालक श्री. श्रीनिवास अन्नलदास, आदी संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग उपस्थित होते,
सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझा सन्मान केला, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आपण हा उपक्रम राबवत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन करतो, छोट्याशा वर्गामध्ये सुरू झालेली शाळा आज मोठी झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी आपण अनेक उपक्रम राबवत आहात त्यामध्ये गुरुपौर्णिमा हा उपक्रम देखील पालक वर्गाला या ठिकाणी बोलावून विद्यार्थ्यांना त्यांचे पाय धुवून गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते पटवून देता त्याचप्रमाणे गुरु पौर्णिमा हा उस्तव ज्याप्रमाणे पालकांसोबत साजरा करता त्याचप्रमाणे अपंग व निराधार, ज्येष्ठ नागरिकांसोबत देखील करावा असे मत यावेळी डॉ. यशवंत म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, विद्यार्थ्यांना संस्कार देण्यासाठी आम्ही गीतापठण करत आहोत, जेणेकरून विद्यार्थी हे संस्काररूपी बनतील असे मत डॉक्टर निकेश गोसरानी यांनी व्यक्त केले, इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मा नगर या माध्यमिक विद्यालयाची प्रगती झालेली दिसत आहे इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पाहत आहोत गेली बावीस वर्ष शारदा एज्युकेशन सोसायटीने व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मानगर या शाळेसाठी केलेली मेहनत आज आपल्यासमोर दिसत आहे, विवेकानंद शिक्षण संस्था ही आत्ता रोप्य वर्षात लवकरच पदार्पण करेल व त्यावेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून भिवंडी शहरात आपल्या शाळेचे नाव उज्वल करतील असे म्हणायला वावगं ठरू नये,
महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे व या भूमीमध्ये साधुसंतांचे पुण्य कर्म व त्यांनी केलेले कार्य या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे,
सदर शाळेमध्ये एकूण ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत २००० विद्यार्थी संख्या आहे, यापुढे या संख्येत अजून वाढ होईल, सदर स्नेहसंमेलनामध्ये आजी ,आजोबा,आई ,वडील व मुले यांच्यामध्ये दुरावा कसा निर्माण होतो व आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, याबाबत सुंदर नाटिका सादर करण्यात आली व या नाटीकेमधून आई-वडील व विद्यार्थी वर्ग यांना प्रबोधनात्मक वास्तव्य पाहवयास मिळाले व अशा घटना घडू नये यासाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच सार्थ ठरेल असे मी अभिमानाने सांगतो,
त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थी मलखांब या खेळाच्या माध्यमातून झी 24 तास या चैनल वर मालिकेत सहभागी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व संचालक मंडळाचे मनापासून अभिनंदन करतो,
या ठिकाणी सर्व खेल बघितले मात्र कबड्डी आणि कुस्ती हे दोन मातीचे खेल पहावयास मिळाले नाही त्यामुळे या खेळांनाही शिक्षक वर्ग व संस्थेने सहकार्य केले पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या शाळेत शिकलेला एखादा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए, या अन्य क्षेत्रात पुढे गेला असेल त्या विद्यार्थ्याला अशा स्नेहसंमेलनामध्ये बोलावून त्याचा सन्मान केला पाहिजे जेणेकरून समोरील विद्यार्थ्यांमध्ये आपण ही शिक्षण घेऊन पुढे गेलो पाहिजे ही भावना निर्माण होईल असे यावेळी आपल्या मनोगतात
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर पाटील
यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश कोंडा यांनी केले व या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शैलेश मांजरेकर यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाने व विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल पद्मा नगर या शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्गाने त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

