राजवड शाळेला हिरकणी नवदृष्टी फाउंडेशन कडून मोफत स्पोर्ट ड्रेस,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल यांच्या कार्याची घेतली दखल.
![]()

राजवड शाळेला हिरकणी नवदृष्टी फाउंडेशन कडून मोफत स्पोर्ट ड्रेस.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल यांच्या कार्याची घेतली दखल.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवड ता. पारोळा जिल्हा जळगाव येथे 12 जानेवारी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर मा.आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील, जिजामाता कृषीभूषण ताईसाहेब पुष्पलता पाटील., मा. नगराध्यक्ष अमळनेर ,सरपंच पुष्पलता निळकंठ पाटील , उपसरपंच रेखा प्रवीण पाटील , हरी नामदेव पाटील माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश परदेशी, ग्रामपंचायत सदस्य लोटन देसले, सुभाष पाटील, अरुण पाटील, हरी मोरे, उज्वला पाटील, उषा पाटील, मिनाबाई निकाळजे, निळकंठ पाटील हजर होते. यावेळी हिरकणी नवदृष्टी प्रतिष्ठान पुणे च्या अध्यक्ष डॉ.राजेश्वरी पंकज पाटील यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकीजा पटेल यांच्या कार्याची दखल म्हणजे आतापर्यंत मिळालेले पुरस्कार, शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पोर्ट ड्रेस उपलब्ध करून दिला. माननीय दादासाहेब मा. आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते स्पोर्ट ड्रेस वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष भाषणात आमदार साहेबांनी केले. यावेळेस मा .आमदार कृषीभूषण दादासाहेब साहेबराव पाटील यांनी अकरा हजार रुपये ,सौ पुष्पलता पाटील सरपंच राजवड यांनी अकरा हजार रुपये , रेखा पाटील उपसरपंच पाच हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य अडीच हजार रुपये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश परदेशी अडीच हजार रुपये एवढी देणगी देण्यात आली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पाकीजा पटेल यांनी केले व आभार वैशाली सोनवणे यांनी मानले.

