1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Loading

राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थीनी अर्चना उदिलाल भिल सह अनेक मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेषभूषा करून सुंदर असे भाषण सादर केले तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी सामुदायिक गीत, कविता यांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांच्या विषयावर सुंदर असे भाषण सादर केलीत. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विदयार्थ्यांना कचोरी देण्यात आली. व गुणवंत विदयार्थी यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण भिल हे होते श्रीमती. सुत्रसंचालन मुख्याध्यापक भुषण पाटील यांनी केले व आभार श्रीमती. सुजाता पाटील मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास गावातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *