1 min read

माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी

Loading

माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी

शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना ब्लेकेट वाटप सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद
यांची जयंती साजरी करन्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक तायडे मँडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राजमाता जिजाऊ च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि. जिजामाता,(राजमाता जिजाऊ) यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.स्त्री ला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या एका क्रांतीज्योतीने इतिहास घडविलाय.अश्या ह्या मासाहेब जिजाऊ त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.उपस्थित सर्वानीं पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करन्यात आली.यावेळी पोलीस उप निरिक्षक आनिता फसाटे यांना सेवा गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करन्यात आले,यावेळी माणुसकी समुहाच्या महिला सभासद उपस्थित होत्या,पोलीस निरिक्षक आम्रपाली तायडे मँडम,पोलीस उप निरिक्षक आनिता फसाटे मँडम,ज्योती गात मँडम,पोलीस नाईक आशा गायकवाड,मनिषा बनसोडे,
सौ.पुजा पंडित,रंजना दंदे,लक्ष्मी पंडित,समाजसेवक सुमित पंडित,देविदास पंडित,राम पंडित,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *