1 min read

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ——!

Loading

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ——!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लालबहादूर शास्त्री यांचे विद्यापीठ शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शास्त्री ही पदवी प्राप्त केली.त्यानंतर त्यांनी श्रीवास्तव हे त्यांचे मूळ आडनाव काढून शास्त्री हे नाव धारण केले. 1921 च्या स्वातंत्र्य युद्धात त्यांचे असहयोग आंदोलन, 1930 च्या दांडी यात्रेत सक्रिय सहभाग तसेच 1942 च्या भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९४७ मध्ये लालबहादूर शास्त्रीजी यांना पोलीस व वाहतूक परिवहन मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी पहिल्यांदाच बस मध्ये महिला कंडक्टर नियुक्ती केली. १९६४ मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले. भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सेनेला स्वतंत्रता दिली. 11 जानेवारी 1966 च्या भारत-पाक युद्धातील समाप्तीनंतर करारावर सही केल्यानंतर त्यांचा मध्यरात्री रहस्य पूर्ण पद्धतीने मृत्यू झाला .त्यावेळी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला असे सेवविच्छेदन न करता सांगण्यात आले .लालबहादूर शास्त्रीजी यांनी भारताला ” जय जवान , जय किसान “हा नारा दिला. सदर प्रसंगी शाळेतील शिक्षिका आर. एम. ताडे ,बी. एस. चव्हाण, सी. डी. निकम, ए .यु. महाजन, पी.पी. पाटील, एस. एस .तेले तसेच शिक्षक व्हि. डी.पाटील, पी. एम. ठाकरे, डी. एस. माळी, आर. डी .महाजन, एम. एस. सुशीर, डी .एस. कारले, वाय. जे. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैदाने यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *