३३ वा रस्ता सुरक्षा सप्ताह चे डोंबिवली येथे भव्य रॅलीद्वारे सुरुवात..
![]()
३३ वा रस्तासुरक्षा सप्ताह चे डोंबिवली येथे भव्य रॅलीद्वारे सुरुवात..
एएसजी आय हॉस्पिटल सौजन्याने, आर एस पी युनिट,आणि एनएसएस छात्र , यांचा सहकार्याने डोंबिवलीत हरियाली द्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान,.



मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी )::ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ,वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांचा आदेशानुसार, कल्याण डोंबिवली सहायक वाहतूक पोलीस उपायुक्त मंदार धर्माधिकारी, वाहतूक उपशाखा डोंबिवली चे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांचा प्रमुख नेतृत्वाखाली, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचा सहकार्याने आणि ए एस जी आय हॉस्पिटलचे डॉ. हरिष पाठक यांचा सौजण्याने “३३ वा रस्ता सुरक्षा सप्ताह” निमित्त वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक गित्ते साहेब व आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ मनिलाल शिंपी यांचा मार्गदर्शनाखाली सकाळी ७.३०.वाजता नेरूरकर कनिष्ठ महाविद्यालय येथून भव्य रॅली द्वारे सुरुवात करण्यात आली.यावेळी डोंबिवली वाहतूक पोलिस उपनिरीक्षक नवनाथ चव्हाण, ए इएस आय विकास इशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल नलावडे, सुखदेव आव्हाड, सफिक तडवी, महिला पोलिस शिपाई सावली भांडे, वॉर्डन निलेश जेम्स, राजेश शहाणे,रमजान तडवी ,विनायक विर,यांनी सर्व विद्यार्थ्यांना पोस्टर उपलब्ध करून, रस्त्यावर कोणताही अडथळा येणार नाही याबाबत नियोजन केले. सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे, यांनी संपूर्ण रॅलीचे नियोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.ओमकार इंटरनॅशनल स्कूल चे संगीत ऑडिओ ग्राफर केतन कापडणे यांच्या नेतृत्वात शाळेचे बँड पथक उत्साहाने रॅलीत सहभागी झाल्यामुळे रॅलीला विशेष महत्त्व आणि आकर्षण प्राप्त झाले. प्रा.अनंत उतेकर, विकास महाजन, करण जडेजा, प्रियांगी मॅडम, सुधाकर नगीने,ओमकार स्कूल चे बँड मास्टर केतन कापडणे,यांनी विशेष परिश्रम घेतले.या रॅलीत प्रगती महाविद्यालय,नेरूरकर कनिष्ठ महाविद्यालय,के.एन. पटेल महाविद्यालय, मडवी महाविद्यालय, प्रकाश विद्यालय, एचीव्हर्स कॉलेज कल्याण,मधील एनएसएस चा छात्र सैनिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह उद्घाटन यशस्वी . आर एस पी अधिकारी युनिट मनिलाल शिंपी यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू भगिनींनी , एनएसएस छात्र,यांनी विशेष परिश्रम घेतले.रामनगर वाहतूक शाखेत रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह रॅलीच्या समारोप करण्यात आला व उपस्थित सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे आणि विद्यार्थी मित्रांचे आरएसपी कमांडर शिंपी यांनी आभार व्यक्त केले.

