1 min read

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील

Loading

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव

गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
विज्ञान प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत आहे. भरवस संस्थेचे अध्यक्ष सचीव व संचालक मंडळ यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी शिक्षकांचा सहभाग ही मोठी जमेची बाजू आहे. निश्चितच याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत भविष्यात शास्त्रज्ञ तयार होतील असे अमळनेर तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भरवस हायस्कूलमध्ये प्रस्ताविक करताना अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील बोलत होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्टार असतात. ते कृतीतून प्रगती करतात. विज्ञान प्रयोगातून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे मोठे काम होते, असे प्रतिपादन विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटक प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले.

तालुक्यातील भरवस येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुक्यातील श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान

प्रदर्शनाचे उदघाटन मंगळवारी झाले. उदघाटन करताना आगपेटीचा वापर न करता तंत्राने मशाल पेटविण्यात आली. मंत्राने काहीच चमत्कार होत नाही, या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनचा संदेश देण्यात आला.

अध्यक्षस्थानी सांदिपनी शिक्षण होते. मंडळ भरवसचे अध्यक्ष संजय श्रीराम सोनवणे हे होते. डाएट अधिव्याख्याता डॉ. डी. बी. साळुंखे, डॉ. वैशाली पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, विस्तार अधिकारी पी. डी. धनगर,ग.स.संचालक व शिक्षणाविस्ताराधिकारी रावसाहेब पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शिक्षक पतपेढी सचिव तुषार बोरसे, आर. जे. पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर, मधुकर चौधरी, भरवसचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव विजय सोनवणे आदी उपस्थित

सूत्रसंचालन तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. आभार आर. आर. सोनवणे यांनी मानले. परीक्षक म्हणून डी. ए. धनगर, पी. डी. पाटील, जयश्री जगताप, डी. व्ही. भलकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *