सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन
![]()


सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन
लोणी काळभोर- ज्येष्ठ समाजसेविका अंनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र च्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात दि.४ जानेवारी २०२३ रोजी कडुनिंब, चिंच, खैर, वड, अशा ११ जंगली वृक्षांची लागवड ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप तसेच ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख श्री.बाबासाहेब यादव यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
सिंधुताईचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी झाला. सिंधुताई सपकाळ या भारतातील समाजसुधारक आहेत त्यांना लोक माई या नावाने ओळखतात. त्याकाळी भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूप कठीण होते. त्यांना चूल आणि मूल फक्त एवढेच अधिकार प्राप्त होते त्यामुळे त्यांची पिळवणूक व्हायची. गरीब असो वा श्रीमंत त्यांना समाजातील अडचणींना सामोरे जावे लागायचे. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदारी आणि लवकरच लग्न यामुळे त्यांना चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. आज त्यांची प्रथम पुण्यतिथीनिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

