मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे शहरात ब्लेंकेट वाटप
![]()
गेल्या काही वर्षापासून मौलाना आझाद फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत संस्था सामाजिक बांधीलकी जोपासत आहे ,विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना विविध क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित केले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले.


मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे शहरात ब्लेंकेट वाटप
गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रस्त्याचा आश्रयाने झोपणारे गरीब गरजूंना मौलाना आझाद फाऊंडेशन तर्फे ब्लेंकेट वाटप करण्यात आले.
अचानक ब्लेंकेट मिळाल्याने चेहऱ्यावर हसू आले.
आमचे मार्गदर्शक श्री.ए.ए.के.शेख सर
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नानकदास तलरेजा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाला मोनाली कुमावत, खान सर, जाबाज शेख,सोनाली कुमावत, मनोज भालेराव, सुनील दाभाडे, जिनल जैन यांचे परिश्रम लाभले.
या कार्यक्रमाचे नियोजन मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले.

