1 min read

कल्याण वाहतूक शाखेतर्फे ,स्वधा फाउंडेशन चा सहकार्याने रेझिंग डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी आर एस पी युनिट योगदान अभिमानास्पद आहे.:: वाहतूक पोलिस निरीक्षक महेश तरडे

Loading

कल्याण वाहतूक शाखेतर्फे ,स्वधा फाउंडेशन चा सहकार्याने रेझिंग डे निमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन – रेझिंग डे यशस्वी करण्यासाठी आर एस पी युनिट योगदान अभिमानास्पद आहे.:: वाहतूक पोलिस निरीक्षक महेश तरडे .

कल्याण:( मनिलाल शिंपी ):कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, शहर वाहतूक शाखा कल्याण पश्चिम येथे एसीपी.मंदार धर्माधिकारी , वरिष्ठ वाहतुक पोलिस निरीक्षक श्री.महेश तरडे साहेब यांचा नेतृत्वाखाली रेझिंग डे -2023 , चा निमित्ताने स्वधा फाउंडेशन चा चेअरमन इव्हा मॅडम यांचा प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी, अंमलदार,रिक्षा चालक यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बीपी तपासणी बोन टेस्टिंग, वजन समस्या, आणि डेंटल तपासणी ,अशा विविध आरोग्य तपासणी मशीनचा सहाय्याने सुमारे २५० लोकांची तपासणी करण्यात आली. तसेच रेझिंग डे सप्ताह यशस्वी करण्यासाठी आर एस पी अधिकारी युनिट चे योगदान अभिमानास्पद आहे.असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी व्यक्त केले.. भगवान आरोटे, श्रीमती नंदिनी शिंदे, हे. कॉ.श्रोत्रि, उपनिरीक्षक संतोष भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी केले.यावेळी आर एस पी अधिकारी शिक्षक बाबासाहेब गुंजाळ, सतिष भोईर , शरद बोरसे,आर एस पी स्वयंसेवक श्याम सोनवणे,यांनी विशेष परिश्रम घेतले. आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा विशेष मार्गदरशनाखाली व संपूर्ण आर एस पी युनिट चा विशेष सहकार्याने रेझींग डे यशस्वी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.आरोग्य शिबिरासाठी वॉर्डन तुषार पाटील, आतिष, व सर्व वाहतूक पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *