आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे सावित्रीमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा !….
![]()
आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे सावित्रीमाई जन्मोत्सव उत्साहात साजरा !….
बालिका दिनाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रश्नमंजुषाचे आयोजन !…..


प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ व सत्यशोधक दिनदर्शिका भेट !…….
प्रतिनिधी – पी डी पाटील सर
भडगाव :- महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगाव संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महिलांना शिक्षणाचा स्वर्ग खुला करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती उत्सवाच्या औचित्याने “बालिका दिन” व “महिला मुक्ती दिन” साजरा करतांना वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.रोकडे सर होते. “महिलांच्या उत्थानात क्रांतीज्योती सावित्रीमाईंचे योगदान” या विषयावर इयत्ता पाचवी ते आठवी च्या वयोगटातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेचे परीक्षणाचे काम विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती सोनवणे मॅडम व श्रीमती निकुंभ मॅडम यांनी पाहिले. सदर कार्यक्रमातून पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी शंभर रुपये देऊन गौरविण्यात आले.
महिला मुक्ती दिनाच्या औचित्य साधून सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्यामार्फत सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पी डी पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १०० मुलींनी सहभाग नोंदवला. कला विभागात अमृता सुरेश पाटील प्रथम, वैष्णवी विठ्ठल जाधव द्वितीय, पुनम किसन खैरे तृतीय, तर विज्ञान विभागात राजनंदनी निलेश तहसीलदार प्रथम, दर्शना विनायक पाटील द्वितीय, सृष्टी किरण पाटील तृतीय, चेतना समाधान पाटील उत्तेजनार्थ बक्षीस मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे ग्रंथ व सत्यशोधक दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य एस पी रोकडे पर्यवेक्षक जी टी माळी, एस पी बोरसे, देसले सर, तायडे सर, पावरा सर, महाजन सर, महाजन मॅडम, पाटील मॅडम, मोरे मॅडम, आमोदे मॅडम, पंकज डी पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे आर एस सोनवणे यांनी केले.

