चलो चाकूर
![]()

चलो चाकूर
मराठी पत्रकार परिषदेचा तालुका अध्यक्ष मेळावा आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारीमध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे होत आहे.. पुरस्कार वितरण सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात घेतले जातात.. पाटण, पालघर, वडवणी, गंगाखेड आदि ठिकाणी यापुर्वी हे सोहळे झाले आहेत.. यावर्षी चाकूर तालुका पत्रकार संघाच्या विनंतीवरून हा सोहळा चाकूर येथे घेण्याचे नक्की केले आहे.. परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी चाकूर येथे भेट देऊन नियोजित कार्यक्रम स्थळाची पाहणी केली..यावेळी संगमेश्वर जनगावे , चाकुर तालुका मराठी पञकार संघाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे , सचिव विकास स्वामी , संजय पाटील श्री. वाघमारे आदि चाकूरकर पत्रकार मित्र उपस्थित होते..
चाकूर दूरचा तालुका असला तरी तेथे उत्तम व्यवस्था होऊ शकते याची खात्री शिष्टमंडळास झाली.. पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लक्षात घेऊन तारखेची घोषणा लवकरच करण्यात येईल..
आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाची घोषणा पत्रकार दिनाच्या पुर्व संध्येला ५ जानेवारी रोजी होईल..अशी घोषणा एस.एम देशमुख यांनी केली..

