1 min read

स्वराज्य पेजवर व चॅनल वर क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

Loading

स्वराज्य पेजवर व चॅनल वर क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बीड येथून आदरणीय ऍडव्होकेट हेमाजी पिंपळे मॅडम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांनी एकपात्री नाटक सादर केला व प्रा.बी.जी.गायकवाड सर संभाजीनगर यांनी सावित्रीबाई जोतीराव फुले यांची प्राथमिक माहिती
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली.स्वराज्य देशा पेज व चॅनल चे आयोजक संचालक मुरलीधर बेडगे ,व्यंकट होनाळे, रुपाली ताई पाटील, मनीषा बेडगे,विशाखा रुपदा, कमलेश जगताप, रामसिंग सलामपुरे, डॉ,सिमा साळवे, संदिप लामतूरे,बळवंत भेगडे,सोपान बेडगे,राजू बेडगे यांनी परिश्रम घेतले.सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला.

लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *