कर्जत येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी
सौ. हर्षाली सैंदाणे माळी यांची तांत्रिक अधिकारी पदी निवड
![]()

कर्जत येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी
सौ. हर्षाली सैंदाणे माळी यांची तांत्रिक अधिकारी पदी निवड
शिरपूर- येथील श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित तालुक्यातील तांडा येथील मुकेश आर. पटेल सी.बी.एस.ई. शाळेतील कुस्ती प्रशिक्षक सौ. हर्षाली कन्हैय्यालाल माळी (सैंदाणे) हिची अहमदनगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा 2022-23 साठी तांत्रिक अधिकारी (पंच) म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ही निवड जाहीर केली.
विशेष म्हणजे या राज्यपातळीवरील स्पर्धांमध्ये सौ. हर्षाली माळी सैंदाणे हिची तांत्रिक अधिकारी म्हणून सातव्यांदा निवड झाली असून अशी निवड होणारी ती खान्देशातील एकमेव महिला आहे. सौ. हर्षाली ही उच्च विद्याविभूषित असून एम.ए., बी.पी.एड्. , एम.पी.एड्. योगा एम.ए., उत्तीर्ण झाली असून क्रिडा क्षेत्रातील विविध पुरस्काराची ती मानकरी आहे. कुस्ती क्षेत्रातही तिने महिला कुस्तीपटू म्हणून विशेष नावलौकिक मिळविला आहे. कोलंबो येथील कुस्ती स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली होती. सौ. हर्षाली ही धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैंदाणे यांची कन्या असून शिरपूर येथील प्रगतिशील शेतकरी स्व. छगनराव भगवान माळी यांची स्नुषा आहे. हर्षाली सैंदाणे माळी हिच्या निवडीचे जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले.

