1 min read

जीवन ऋणाचे….

Loading

जीवन ऋणाचे….

इथे नसे, कुणी कुणाचे
सावज शोधती, जातीचे.

बोलती दुग्ध शर्कराचे
इथे,पेले भरती जहराचे

साउली धरुनी उंबराची
बिछाने टाकती विस्तवाचे

का म्हणावे जळूनी इथे
मी,शितल हृदय तयाचे

सुटला नाही कधी रोग
दवा-पाण्याचे किती बहाणे

तुझ्या,माझ्यात काहीच नाही
रस्ता मोकळा बंद चालने

नको, डोंगर फोडू लाथने
कण- भर,जग माणुसकिने

वादात जीवन भोवले
श्रेष्टात कोण विसरले

इथे गजलेत माझ्या…
आहे दिन -रात मतले.

नजरेत कुणाच्या..
मला कधीच ना दिसले

किस्से,जीवन ऋणाचे
इथे ,कधी ना फिटले

जीवन ऋणाचे…. – Marathi
कवी-बबनराव वि.आराख
गांगलगाव.
7875701896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *