1 min read

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही !

Loading

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करावा : शनिवारी लातूर जिल्हयात ग्राहकदिन साजरा झालाच नाही !

अतनूर, ता. २४ : राष्ट्रीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर) हा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केली आहे.
यासंदर्भात बालासाहेब शिंदे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले आहे. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. काही तहसिल कार्यालयामध्ये आपल्या सोयीने आणि केवळ एक औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे शनिवारी २४ डिसेंबर रोजी लातूर जिल्हयातील एकाही तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला नाही. हा एकप्रकारे अपमान कारक तथा मंत्रालय सचिवानी काढलेल्या शासकिय आदेशाची पायमल्ली करित पायदळी तुडवित शासकिय आदेशाला हारताळ फासत वरिष्ठांनी, अधिकारी, कर्मचारी यांनी केराची टोपली दाखविले. तसे न करता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात यावा. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सर्वसामान्य ग्राहक राजाला जागृत करण्यासाठी शासकीय पातळीवर हा दिवस एक ‘राष्ट्रीय उत्सव’ म्हणून साजरा होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम करीत असलेल्या ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संस्थेचे जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करतील. ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून कोरोनाचे सर्व नियम पाळून हा दिवस साजरा करण्यात यावा. जेणेकरून ग्राहक संरक्षण कायद्याचा खरा उद्देश सफल होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *