1 min read

अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

Loading

अमळनेर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

अमळनेर तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्राहक दिनाला खूप महत्त्व असून या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला होता.या प्रमाणे दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस भारतात विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. यावर्षी संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही यावर्षीची संकल्पना आहे.
या संकल्पनेवर ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टिकोनातून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 यावर प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार अमळनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय. एम. ए हॉल जी एस हायस्कूल अमळनेर येथे घेण्यात आला.

या कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त तहसीलदार आर.जी.चव्हाण, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. संजय बोरवाल अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नंदुरबार, प्रमुख अतिथी मा. प्राचार्य विजय बहिरम, मा.डॉ अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगाव, मा. विकास महाजन मा. सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय मुंबई तथा राज्य कार्याध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन, तसेच प्रमुख पाहुणे ऍड सौ.भारती अग्रवाल महिला प्रमुख मध्य महाराष्ट्र व तालुकाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मा.हेमंत भांडारकर जिल्हाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन जळगाव, मा.सौ मेघा भांडारकर महिला जिल्हाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मा. संजय बोरवाल यांनी Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक संघटनेच्या ऍड सौ भारती अग्रवाल,हेमंत भांडारकर,विकास महाजन यांनी ग्राहक हक्काबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमास मकसुद बोहरी जिल्हा संघटक व तालुका निरीक्षक अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले, सौ कपिला मुठ्ठे जिल्हा सहकोषाध्यक्ष व तालुका सचिव अमळनेर, प्राचार्य रवींद्र माळी तालुकाध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन अमळनेर, विजय शुक्ल ,सुनील वाघ ,जयंतलाल वानखेडे, वनश्री अमृतकर, अशोक पवार सर,सुभाषआण्णा चौधरी, महेंद्र बोरसे, प्रवीण गोसावी, पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे,पुरवठा निरीक्षक एन.एम.जाधव, लिपिक चित्रलेखा समुद्रे, प्रतिभा सूर्यवंशी जळगाव,सुनीता करंजे ,ज्योती भावसार,अंजली सपकाळ तसेच तालुक्यातील ग्राहक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पुरवठा कार्यालयातील सर्व कर्मचारी व ग्राहक संघटनेतील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *