1 min read

लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Loading

लोणी काळभोर येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

लोणी काळभोर- शैक्षणिक, वैद्यकीय कार्यात सदैव सक्रिय असणारे,सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटक मा.श्री. स्वप्नील दादा मेमाणे तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ शेंडगे
यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात करंज,वड,खैर,कडूनिंब,सुभाबुळ,अशा १०१ जंगली वृक्षांचे रोपण शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रमोद भाऊ काळभोर तसेच शिवशाही प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, वन विभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती लोणी काळभोर, श्रीमंत अंबरनाथ तरूण मंडळ, शंभुराजे प्रतिष्ठान लोणी काळभोर, शिवरूद्र प्रतिष्ठान लोणी काळभोर, गिरीश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था यांच्या उपस्थित करण्यात आले.
एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. यातून भारतीय वनसर्वेक्षणाचा इतिहास व त्याचे महत्त्व, भारतीय वनसंपत्तीसमोरील संधी व आव्हाने, तसेच वनशेती किंवा वनीकरणाच्या दृष्टीने आवळा लागवडीचे महत्त्व अधोरेखित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद भाऊ काळभोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *