1 min read

खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Loading

खाकीतिल देव माणुस देविदास गात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

देविदास भागवतराव गात
पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस ठाणा चिकलठाणा येथे कार्यरत आहेत.
देविदास गात यांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे झाले त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतचे शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद आणि नववी दहावीचे शिक्षण पॉली क्रॉस मराठी हायस्कूल छावणी औरंगाबाद येथे झाले महाविद्यालयीन शिक्षण सरस्वती भुवन सायन्स कॉलेज औरंगाबाद येथे झाले. देविदास गात यांना पोलीस दलाची आवड असल्याने ते १९९० सालामध्ये पोलीस दलात भरती झाले.
त्यांनी आतापर्यंत औरंगाबाद जिल्हा गडचिरोली जिल्हा अहमदनगर संगमनेर नांदेड जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तसेच वाहतूक विभागात सेवा केलेली आहे.गडचिरोली जिल्ह्यामध्ये असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून केवळ नक्षलविरोधी कारवाया मध्येच नाही तर आदिवासी समाज व सर्वसामान्य माणसांसाठी अनेक उपक्रम राबविले आणि जनजागृती करून समाजाचे काही ऋण आपल्यावर आहेत या भावनेने त्यांनी सेवा बजावलेली आहे. त्या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यामुळे वर्धा येथील सेवाग्राम आणि आंध्र प्रदेशातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पाठवून त्यांची सेवा केलेली आहे.
त्यांनी पर्यावरणाची जोपासना व्हावी यासाठी विद्यार्थी व तरुणांना नेहमी प्रेरणा देऊन अनेक लहान मोठे उपक्रम राबविले जात ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाई मोहीम पाणी आडवा पाणी जिरवा तसेच झाडे लावा झाडे जगवा यासारखी उपक्रम सामान्य जनतेचे सहकार्याने राबविले आहेत.त्यांच्या आजपर्यंतचे एकंदर सेवा काळामध्ये त्यांनी राज्य गुप्त वार्ता विभाग, विशेष सुरक्षा विभाग , दहशतवाद विरोधी विभाग, आर्थिक गुन्हे शाखा यासारख्या अत्यंत महत्वपूर्ण विभागामध्ये चांगल्या प्रकारची सेवा बजावलेली आहे. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था विशेषतः अनाथ बालकांसाठी त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेवा दिलेली आहे.तसेच ते गोसेवक सुद्धा आहेत. विविध वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्या ठिकाणी विविध मदत कार्य ते नेहमीच करत असतात. सामाजिक उपक्रमांमध्ये हिरवी ने भाग घेऊन त्या ठिकाणी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरित करण्याचे कार्य प्रोत्साहित करण्याचा कार्य ते नेहमीच करत असतात.त्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये २०० पेक्षा अधिक बक्षिसे आणि माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शौर्यासाठी सन्मानचिन्ह २००४ साली प्रदान करण्यात आलेले आहे.तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेबद्दल वेळोवेळी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केलेले आहे.त्यांना वाचनाची व लिखाणाची आवड असून विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यामध्ये रुची आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन.हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्हि सेटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे नीवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराने देविदास गात यांचे कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *