1 min read

चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम

Loading

चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आज माजी आमदार कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन डॉ.दीपक ओंकार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आर.आर.शिंदे,संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई पाटील तर,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती.आशाताई पाटील उपस्थित होते.
स्पर्धेत जिल्हाभरातून १२ संघ सहभागी झाले. त्यात प्रथम कार्तिका चौधरी,
पंकज महाविद्यालय,चोपडा द्वितीय,दिनेश सोनवणे, भाऊसाहेब गुलाबराव पाटील महाविद्यालय, पाळधी,तृतीय बाविस्कर दीक्षा, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, एम.जे. कॉलेज, जळगाव, उत्तेजनार्थ पाटील चंचल,कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा बक्षिसांचे मानकरी ठरले असून,त्यांना अनुक्रमे २१००,१५००,१०००,५००,
रुपये रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा.डॉ.अरुण मोरे,चोपडा व प्रा.अतुल इंगळे, जळगाव यांनी जबाबदारी पार पाडून विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शनही केले.
बक्षीस वितरणापूर्वी स्पर्धक तसेच संघ प्रमुख प्रा.एम.एम.पाटील,अडावद व प्रा.ईश्वर राजपूत घोडगाव यांनी प्रातिनिधिक मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनाविषयी गौरवोद्गार काढलेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य, प्रा.एन.एस.
कोल्हे, प्रा.डॉ. के.एन. सोनवणे,पर्यवेक्षक प्रा.एस. पी.पाटील,समन्वयक प्रा.एस.के.बोरसे,प्र.रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील,यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुखदेव शिंदे, प्रा.प्रमोद पाटील,
प्रा.समाधान पाटील, प्रा.दीपाली पाटील,
प्रा.संदीप देवरे, प्रा.पुष्पा दाभाडे, श्री.राकेश काविरे यांनी परिश्रम घेतलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वक्तृत्व मंडळ प्रमुख प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले तर, आभार उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी मानलेत.