1 min read

मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी,ॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्तीॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्ती

Loading

मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी

‘ॲग्रोवन’ चे प्रतिनिधी सुर्यकांत नेटके यांची नियुक्ती

मुंबई : नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दक्षिण नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नगरमधील सकाळच्या ‘ॲग्रोवन’ या कृषीविषयक दैनिकाचे पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज येथे केली आहे..सूर्यकांत नेटके यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. नेटके सुमारे २२ वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. तेव्हापासूनच ते परिषदेशी जोडले गेले आहेत. बीड व नगर जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यांना पत्रकारितासाठी अनेक सरकारी पुरस्कार मिळाले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार सारख्या ग्रामीण भागात,गाव बातमीदार, तालुका बातमीदार म्हणून दहा-आकरा वर्ष काम केल्यानंतर अहमदनगरमध्येही बारा वर्षापासून काम करत आहेत. शेती, सहकार, ग्रामविकास आणि खास करुन ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवर लेखन करतानाच शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकऱ्यांचे प्रश्न जमेल तसे ते मांडत आले. ‘अॅग्रोवन’ मुळे त्यांना अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळतेय. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मार्गदर्शक एस.एम. देशमुख, विश्वस्त किरणजी नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरदजी पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मन्सुर भाई शेख, नगरमधील वरिष्ठ पत्रकार मित्र विजयजी होलम, बीडचे अनिलराव महाजन, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष अमोल वैद्य यांच्यासह परिषदेतील इतर मित्रांमुळे नगर दक्षिण जिल्ह्यात काम करण्याची आपणास संधी मिळाली असून तसा हा भाग दुष्काळी आहे. दक्षिणेतील ग्रामीण भागात परिषदेच्या माध्यमातून माणसाला माणसे जोडत परिषदेसाठी आणि पत्रकारासाठी शक्य तेवढे जास्त काम करु. अशी प्रतिक्रिया सूर्यकांत नेटके यांनी व्यक्त केली.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी सूर्यकांत नेटके यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी यापूर्वीच अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कार्यकारिणी जाहीर करून कामालाही सुरुवात केली आहे. आता नगर दक्षिण भागातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव या तालुक्यातील परिषदेचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सूर्यकांत नेटके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *