1 min read

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Loading

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ——-! !
आज 20 डिसेंबर रोजी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस शाळेतील ज्येष्ठ शिक्षक वाय. जे .पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सदर प्रसंगी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी विचार व्यक्त केले की, दिन दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा, देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, पोथी- पुराणे, मंत्र- तंत्र, देव देवसकी, चमत्कार अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी पूर्ण जीवनभर आपले आयुष्य खर्च केले .गोपाला -गोपाला देवकीनंदन गोपाला या जय जयकाराने कीर्तनातून कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची ,दुर्गुण- दोषाची जाणीव करून देत होते. व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, असे कीर्तनातून सांगत असत !
महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत “ज्ञानदेवे रचिला पाया ,तुका झालासे कळस ” या भागवत धर्माच्या कळसावर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी विसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा फडकवली. ” मी कोणाचा गुरु नाही ,मला कोणी शिष्य नाही ” असे ते आपल्या कीर्तनातून कायम सांगत असत सदर प्रसंगी मुख्याध्यापक एस. जे. पवार, ए. पी. जाधव, एम. एस. सुशीर, डी. एस. कारले, डी. एस. माळी ,आर. डी. महाजन आणि शिक्षिका बी. एस. चव्हाण, आर. एम. ताडे, व्ही. डी. जाधव, एस. एस. तेले, सी. डी. निकम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले .कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *