1 min read

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून रस्त्यातील मेंढपालांना ब्लॅंकेटचे वाटप!

Loading

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून रस्त्यातील मेंढपालांना ब्लॅंकेटचे वाटप!

परिवर्धे ( मनिलाल शिंपी)
नंदुरबार जिल्ह्यातील, शहादा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मेंढी व बकऱ्या पालन करणारे बरेचसे कुटुंब आहेत, अशा कुटुंबाला मदतीचा हात म्हणून मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून, आर एस पी कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील,स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेश भाई ठक्कर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे, भिवंडी पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता श्री अरविंद भोंडवे ऍडव्होकेट श्री अविनाश म्हामुनकर कल्याण व आंबिवली येथील समाजसेवक यांच्या सहकार्याने शहादा तालुक्यातील परिवर्धे परिसरामध्ये प्रकाशा दक्षिण काशी येथे निराधार वृद्ध महिलांना साडी वाटप व काथर्दे, वाघोदे, वैजाली, गावातील रानात अत्यंत थंडीच्या वातावरणात मेंढपाळ करणारे शेलार मामा च्या वस्तीमध्ये त्यांच्या मेंढीकळपात जाऊन ब्लॅंकेट, जिलेबी व गोडशेव वाटप उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या ऊक्तीप्रमाणे ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांची सेवा करत असतो या सर्व माऊलींची सेवा करण्याची संधी आम्हाला मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातुन लाभली आहे. त्यामुळे मानव सेवेतून ईश्वर सेवा केल्याचे भाग्य आम्हा सर्वांना मिळाल्याचा आनंद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *