1 min read

“ग्राहक कल्याण फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष पदी प्रा. रविंद्र माळी यांची नियुक्ती “

Loading

ग्राहक कल्याण फाऊंडेशन अमळनेर तालुका अध्यक्ष पदी प्रा. रविंद्र माळी यांची नियुक्ती

अमळनेर :
ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेच्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांची नियुक्ती अमळनेर येथे संपन्न झालेल्या जिल्हा बैठकित जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी केली. रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे जिल्हा बैठक संपन्न झाली.
बैठकीस महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), जिल्हा सचिव Adv. जास्वंदी भंडारी (भुसावळ),जिल्हा पदाधिकारी अशोक महाजन (रावेर),कैलास महाजन (एरंडोल),प्रा.डॉ.सुभाष किसन महाजन (अमळनेर),Adv.कुंदन साळुंके (अमळनेर),स्रीरोग तज्ञ डॉ.विनोद कोतकर (चाळीसगाव),जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ.मेधा भांडारकर (अमळनेर), ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे तालुकाध्यक्ष रोहित मगर (जळगाव), संजय झोपे (यावल),योगेश महाजन (चोपडा),योगेश भोकरे (चाळीसगाव), कैलास कोळी (मुक्ताईंनगर), गोपीचंद सुरवाडे (बोदवड),विजय पाटील (रावेर) , भूषण रतन महाजन (जळगाव) ,राजधर महाजन,नितीन ठक्कर,नितीन पाटील, पंकज महाजन (एरंडोल),
यांची उपस्थिती होती.
सूत्र संचालन Adv.कुंदन साळुंके यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *