1 min read
प्रतिष्ठा फाऊंडेशनच्या
राज्यस्तरीय प्रतिष्ठा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन-तानाजीराजे जाधव
![]()
प्रतिष्ठा फौंडेशनच्या
राज्यस्तरीय प्रतिष्ठा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तिंना ‘प्रतिष्ठा फौंडेशन’च्या वतीने ‘पुरस्कार’ देवून सन्मानीत केले जाते. गेली सहा वर्षे प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम तासगाव येथे होत आहे. पुरस्काराचे हे ७ वे वर्ष आहे. रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे.
- कृषिरत्न पुरस्कार
- प्रशासनरत्न पुरस्कार
- शिक्षणरत्न पुरस्कार
- उद्योगरत्न पुरस्कार
- कृषिउद्योगरत्न पुरस्कार
- सुवर्णरत्न पुरस्कार
- समाजरत्न पुरस्कार
- साहित्यरत्न पुरस्कार
- आरोग्यरत्न पुरस्कार
- लोककलारत्न पुरस्कार
- युवारत्न पुरस्कार
- क्रीडारत्न पुरस्कार
असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा तासगाव येथे समृद्धी मल्टिपर्पज हॉलमध्ये होणाऱ्या सातव्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक, पाणी चळवळीचे नेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत पाटणकर यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी केले आहे.
इच्छुकांनी आपले प्रस्ताव 8237992022 या वॉटस्अप क्रमांकावर तसेच pratishthafoundation2022@gmail.com या ईमेलवर पाठवावेत.
जेपीजी अथवा पिडीएफ फाईल पाठवावी. प्रस्ताव शक्यतो दोन पानाचा असावा. अधिक माहितीसाठी
तानाजीराजे जाधव यांच्याशी 8237992022 या क्रमांकावर संपर्क करावा.
१) नाव :
२) पत्रव्यवहाराचा पत्ता :
३) जन्म :
४) शिक्षण :
५) संस्था अथवा फर्मचे नाव व पद :
६) आपल्या कार्यक्षेत्रातील कार्य :
७) सामाजिक कार्यातील सहभाग :
८) एक पासपोर्ट अकाराचा फोटो :
या स्वरूपातच माहिती ईमेलवर पाठवावी.
प्रस्ताव पाठविल्या नंतर फोन करावा. 8237992022

