डॉ सिमा साळवे
यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ जाहीर
![]()

डॉ. सिमा शरद साळवे
यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ जाहीर
RHTC पैठण येथील डॉ. सिमा शरद साळवे यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३ चा जाहीर करण्यात आला.औरंगाबाद वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तर्फे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३साठी डॉ.सिमा शरद साळवे यांनी कोरोना काळात स्वतः च्या परिवाराची काळजी न करत जी जनतेची सेवा केली.अनेक रक्तदान शिबिर, मोफत शिबाराचे आयोजन केले.समजातील प्रत्येक सामाजिक आरोग्य विषयी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन सहकार्य केले.पैठणकरांची सेवा करण्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूरा पर्यत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले.त्याबद्दल त्यांची दखल आयोजक मा.सुर्यकांत रामदास मोटे पो.पाटील तथा पोलीस सचिव म.रा.गा.का.पोलिस पाटील संघ जिल्हा सचिव औरंगाबाद यांनी निवड करून निवडपत्र दिले.
RHTC पैठण चे मार्गदर्शक डॉक्टर चव्हाण सर,डॉ. किल्लारीकर सर, डॉक्टर अदुरकर मॅडम, डॉक्टर भावठाणकर मॅडम,डॉक्टर वैशाली मॅडम, डॉक्टर सविता मॅडम ,डॉक्टर शुभदा मॅडम यांच्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल आणि आरोग्य सेविका मनिषा लामतूरे (बेडगे),स्वाती क्षीरसागर, पाठक सिस्टर, सिस्टर ,मुंडे सिस्टर ,आढाव सिस्टर,स्वप्निल साळवे,संत एकनाथ महाराज मंदीर ट्रस्ट, पत्रकार संघ पैठण आणि स्वराज्य देशा पेजचे संचालक मुरलीधर बेडगे यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

