दलित पँथरची बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती जाहीर.
![]()

दलित पँथरची बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती जाहीर.
मुंबई, दि.१५ :- (मर्बाल हिल वर्षा निवास्थानी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.घनश्याम भोसले व शिष्टमंडळाची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांचे आदेशाने दलित पँथर संघटनेची युती जाहीर करून दलित पँथर संघटनेचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
त्यावेळी उपस्थित दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर डॉ.घनश्याम भोसले व प्रमुख शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली आहे.

