सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
![]()

सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
सिंगापुर ता. पुरंदर जी पुणे:
सिंगापूर ग्रामस्थ व भजनी मंडळ सिंगापूर ह्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी अनेक कीर्तनकार,प्रवचनकार ह्यांची प्रवचने, कीर्तने आयोजित करण्यात आले.अखंड हरिनाम सप्ताहाचे हे अठ्ठावीसवे वर्ष आसून ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले. ह्याच कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे व लक्ष्मण उरसळ संचालक पुरंदर शिक्षक प्रसारक मंडळ वाघापूर ह्यांनी वारकरी शिक्षण मंडळ आळंदी ह्या संस्थेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहकार्य केले. ह्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ रविंद्र भोळे म्हणाले की जिथे दया आहे तिथेच धर्म आहे व जिथे धर्म आहे त्या ठिकाणी सुख, शांती असते. आणि अश्या ठिकाणी परमेश्वराचा वास असतो. ह्या कार्यक्रमात बाळासाहेब कोरडे अध्यक्ष भजनी मंडळ सिंगापूर, दशरथ लवांडे माजी सरपंच सिंगापूर ईश्वर तात्या उरसळ माजी सरपंच सिंगापूर, माउली कोरडे, लक्ष्मण उरसळ,अक्षय उरसळ, रामभाऊ उरसळ, विकास पवार, सौरभ लवांडे माजी उपसरपंच सिंगापूर , अमोल भोसले पत्रकार, सुनिल तुपे,पंचक्रोशीतील गावकरी भजनी मंडळे व भाविक भक्त उपस्थीत होते.ह्या वेळी समस्त गावकरी मंडळी ह्यांचे वतिने महाप्रसाद अन्नदान करण्यात आले.

