जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.जळगांव यांना मागण्यांचे निवेदन..
![]()



जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारीसो. (माध्य.) जि.प.जळगाव यांना मागण्यांचे निवेदन सादर.
जळगाव: राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील उ.मा.वि./ क.म.वि.शिक्षकांच्या असंख्य वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने मा. शिक्षणाधिकारी सो.(माध्य. जि.प.जळगाव) यांना निवेदन देण्यात येऊन सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी शिक्षकांची आर्त हाक पोहोचवावी अशी विनंती करण्यात आली. या निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे.
१)जळगाव जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेतूनच व्हावे.
२) ७व्या वेतन आयोगाचा २रा व ३रा हप्ता रोखीने तात्काळ देण्यात यावा.
३)थकीत वेतन बिलांची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी.
४) जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
५) १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना तात्काळ प्रभावाने लागू करण्यात यावी.
६) निवड श्रेणीसाठीची २०% ची जाचक अट रद्द करण्यात येऊन सरसकट निवड श्रेणी लागू करण्यात यावी.
७)वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देऊन वेतन अदा करावे.
८)आय.टी.शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करून वेतन अदा करण्यात यावे.
यावेळी आ.डॉ.सुधीरजी तांबे यांनी भ्रमणध्वनी वरून संघटना पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर आंदोलनास पाठिंबा देत समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील राहून आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास प्रवृत्त करू असे ठोस आश्वासन दिले.
सदर प्रसंगी प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा. सुनील सोनार (सचिव), प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष), उपाध्यक्ष सर्वश्री प्रा.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी, प्रा.राजेश भटनागर जेष्ठ मार्गदर्शक प्रा.डी.डी. पाटील,प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.जे.चिकटे,प्रा.राजेंद्र चव्हाण (सहसचिव) प्रा.राहुल वराडे, प्रा.सुधाकर ठाकूर प्रा.राजेश कोष्टी,प्रा. भगतसिंग निकम,प्रा. दिनेश बोरसे, प्रा.श्रीमती. अनिता ओव्हाळ,प्रा. श्रीमती अस्मा परवीन,प्रा. श्रीमती एम. आर. फाटे, प्रा.श्रीमती.एच. एम.होले, प्रा. महेंद्र राठोड, प्रा.अर्जुन मेटे, प्रा.प्रवीण महाजन, प्रा. गजानन धनगर,प्रा.स्वप्नील पाटील,प्रा. बी.एस.बोरसे, प्रा.हेमंत पाटील, प्रा.कृष्णा जंगले, प्रा.डॉ.विश्वजित बिराजदार, प्रा.नीलकंठ सोनवणे प्रा.ए.बी. सोनवणे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा. दिपक पवार, प्रा.ए. डब्लू. सरदार प्रा.अमित बागुल यांच्यासह जिल्हाभरातील असंख्य शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

